1
|
अगं अगं म्हशी मला कोठे
नेशी
|
स्वत:ची चूक मान्य
करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
|
2
|
आपला हात जगन्नाथ
|
आपली प्रगती आपल्या
कर्तृत्वावर अवलंबून असते.
|
3
|
अति तेथे माती
|
कोणत्याही गोष्टीचा
अतिरेक वाईटच असतो.
|
4
|
आयत्या बिळात नागोबा
|
दुसर्याने स्वत:साठी
केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
|
5
|
आईजीच्या जीवावर बाईजी
उदार
|
दुसर्याचा पैसा खर्च
करून औदार्य दाखविणे.
|
6
|
आपल्याच पोळीवर तूप ओढणे
|
फक्त स्वत:चाच तेवढा
फायदा साधून घेणे.
|
7
|
आंधळे दळते कुत्रं पीठ
खाते
|
एकानं काम करावं आणि
दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
|
8
|
आधी पोटोबा मग विठ्ठोबा
|
आदी पोटाची सोय पाहावी
नंतर देवधर्म करावा.
|
9
|
अडला हरी गाढवाचे पाय
धरी
|
एखाद्या हुशार माणसाला
देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
|
10
|
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
|
अपेक्षेपेक्षा जास्त
फायदा होणे.
|
11
|
अति शहाणा त्याचा बैल
रिकामा
|
जो माणूस फार शहाणपणा
करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
|
12
|
आधी शिदोरी मग जेजूरी
|
आधी भोजन मग देवपूजा
|
13
|
असतील शिते तर जमतील
भुते
|
एखाद्या माणसाकडून फायदा
होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
|
14
|
आचार भ्रष्टी सदा कष्टी
|
ज्याचे आचार विचार चांगले
नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
|
15
|
आठ हात लाकूड अन नऊ हात
ढिपली
|
अत्यंत मूर्खपणाची
अतिशयोक्ती.
|
16
|
आईचा काळ बायकोचा मवाळ
|
आईकडे दुर्लक्ष करून
बायकोची काळजी घेणारा
|
17
|
आधीच उल्हास त्यात
फाल्गुन मास
|
मुळातच आळशी माणसाच्या
आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
|
18
|
आपलेच दात आपलेच ओठ
|
आपल्याच माणसाने चूक
केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
|
19
|
अंथरूण पाहून पाय पसरावे
|
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च
ठेवावा.
|
20
|
आवळा देऊन कोहळा काढणे
|
क्षुल्लक गोष्टीचा
मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
|
21
|
आलीया भोगाशी असावे सादर
|
कुरकुर न करता निर्माण
झालेली परिस्थिती स्वीकारणे.
|
22
|
अचाट खाणे मसणात जाणे
|
खाण्यापिण्यात अतिरके
झाल्यास परिणाम वाईट होतो.
|
23
|
आधी बुद्धी जाते नंतर
लक्ष्मी जाते
|
अगोदर आचरण बिघडते नंतर
दशा बदलते.
|
24
|
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
|
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला
हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
|
25
|
आपला तो बाब्या दुसर्याचं
ते कारटं
|
स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे
वाईट अशी प्रवृत्ती असणे.
|
26
|
अळी मिळी गुप चिळी
|
रहस्य उघडकीला येऊ नये
म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
|
27
|
अहो रूपम अहो ध्वनी
|
एकमेकांच्या मर्यादा न
दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
|
28
|
इच्छा तेथे मार्ग
|
एखादी गोष्ट करण्याची
इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
|
29
|
इकडे आड तिकडे विहीर
|
दोन्ही बाजूंनी अडचणीची
परिस्थिती असणे.
|
30
|
उठता लाथ बसता बुकी
|
प्रत्येक कृत्याबद्दल
अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
|
31
|
उडत्या पाखरची पिसे
मोजणे
|
अगदी सहजपणे अवघड
गोष्टीची परीक्षा करणे.
|
32
|
उधारीचे पोते सव्वाहात
रिते
|
उधारी घेतलेल्या गोष्टीत
तोटा ठरलेलाच असतो.
|
33
|
उंदराला मांजर साक्ष
|
वाईट कृत्य करतांना
एकमेकांना साक्ष देणे.
|
34
|
उचलली जीभ लावली
टाळ्याला
|
विचार न करता बोलणे.
|
35
|
उतावळा नवरा गुडघ्याला
बाशिंग
|
प्रसंगी हास्यास्पद ठरेल
आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
|
36
|
उथळ पाण्याला खळखळाट फार
|
थोडासा गुण अंगी असणारा
माणूस जास्त बढाई मरतो.
|
37
|
उस गोड लागला म्हणून
मुळासकट खाऊ नये
|
कोणत्याही चांगल्या
गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
|
38
|
एक ना घड भारभर चिंध्या
|
एकाच वेळी अनेक कामे
करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
|
39
|
एका माळेचे मणी
|
सगळीच माणसे सारख्या
स्वभावाची.
|
40
|
एका हाताने टाळी वाजत
नाही
|
दोघांच्या भांडणात
पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
|
41
|
ऐकावे जनाचे करावे मनाचे
|
लोकांचे ऐकून घ्यावे व मग
आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
|
42
|
एका म्यानात दोन तलवारी
राहू शकत नाहीत
|
दोन तेजस्वी माणसे एकत्र
गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत
नाहीत.
|
43
|
ओळखीचा चोर जीवे न सोडी
|
ओळखीचा शत्रू हा अनोळखी
शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
|
44
|
कर नाही त्याला डर कशाला
|
ज्याने काही गुन्हा किंवा
वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
|
45
|
कामापुरता मामा
ताकापुरती आजी
|
आपले काम करून घेईपर्यंत
एखाद्याशी गोड बोलणे.
|
46
|
काळ आला होता. पण वेळ
आली नव्हती
|
नाश होण्याची वेळ आली
असताना थोडक्यात बचावणे.
|
47
|
कानामगून आली आणि तिखट
झाली
|
मागून येऊन वरचढ होणे.
|
48
|
करावे तसे भरावे
|
जसे कृत्य असेल
त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
|
49
|
कधी गाडीवर नाव तर कधी
नावेवर गाडी
|
कधी गरीबी तर कधी
श्रीमंती येणे.
|
50
|
कुर्हाडीचा दांडा गोतास
काळ
|
आपलाच माणूस आपल्या
नाशाला कारणीभूत होतो.
|
51
|
काठी मारल्याने पानी
दुभंगत नाही –
|
रक्ताचे नाते तोडून
म्हणता तुटत नाही.
|
52
|
कडू कारले तुपात तळले
सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच
|
किती ही प्रयत्न केला
तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
|
53
|
कुडी तशी पुडी
|
देहाप्रमाणे आहार असतो.
|
54
|
कधी तुपाशी तर कधी उपाशी
|
संसारिक स्थिती नेहमी
सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
|
55
|
कावळा बसायला अन फांदी
तुटायला
|
परस्परांशी कारण-संबंध
नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
|
56
|
कुत्र्याचे शेपूट नळीत
घातले तरी वाकडे ते वाकडेच
|
कितीही प्रयत्न केले तरी
काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
|
57
|
कुंपणाने शेत खाल्ले तर
दाद न्यावी कुणीकडे
|
रखवालादारानेच विश्वासघात
करून चोरी करणे.
|
58
|
कोल्हा काकडीला राजी
|
क्ष्रुद्र माणसे क्षुद्र
गोष्टीनीही खुश होतात.
|
59
|
कोरड्याबरोबर ओले ही
जळते
|
निरपराध्याची
अपराध्यासोबत गणना करणे
|
60
|
कोंबडे झाकले म्हणून
तांबडे फुटायचे राहत नाही
|
निश्चित घडणारी घटना
कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
|
61
|
काखेत कळसा नि गावाला
वळसा
|
हरवलेली वस्तु जवळ
असतानाही इतरत्र शोधत राहणे.
|
62
|
कावळ्याच्या शापाने गाय
मरत नाही
|
क्षुद्र माणसांनी
केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
|
63
|
खाण तशी माती
|
आई वडिलाप्रमाणे
त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
|
64
|
खर्याला मरण नाही
|
खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
|
65
|
खाऊ जाणे ते पचवू जाणे
|
एखादे कृत्य धाडसाने
करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
|
66
|
खाईन तर तुपाशी नाहीतर
उपाशी
|
परिस्थितीशी जुळवून न
घेता हट्टीपणाने वागणारा.
|
67
|
खाऊन माजवे टाकून माजू
नये
|
पैशाच्या संपतीचा गैरवापर
करू नये.
|
68
|
खोट्याच्या कपाळी गोटा
|
वाईट कृत्य करणार्याला
माणसाचे शेवटी वाईटच होते.
|
69
|
गरजवंताला अक्कल नसते
|
गरजेमुळे अडलेल्या
व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
|
70
|
गर्वाचे घर खाली
|
गर्विष्ठ माणसाची कधीतरी
फजिती होतेच.
|
71
|
गरज सरो नि वैध मरो
|
आपले काम झाले की उपकार
कर्त्याची पर्वा न करणे.
|
72
|
गर्जेल तो पडेल काय
|
केवळ गाजावाजा करणार्या
व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
|
73
|
गाढवाला गुळाची चव काय?
|
मुर्खाला चांगल्या
गोष्टीची किंमत कळत नाही.
|
74
|
गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ
|
मूर्ख लोक एकत्र आल्यावर
मूर्खपणाचेच कृत्य करणार
|
75
|
गाव करी ते राव ना करी
|
श्रीमंत व्यक्ति
स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
|
76
|
गाड्याबरोबर नळ्याची
यात्रा
|
मोठ्यांच्या आश्रयाने
लहानांचाही फायदा होतच असतो.
|
77
|
गाढवापुढे वाचली गीता अन
कालचा गोधळ बारा होता
|
मूर्खाला केलेला उपदेश
वाया जातो.
|
78
|
गाजराची पुंगी वाजली तर
वाजली नाही तर मोडून खाली
|
एखादी गोष्ट साध्य झाली
तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
|
79
|
गाढवाच्या पाठीवर गोणी
|
एखाद्या गोष्टीची
अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
|
80
|
गुरुची विद्या गुरूला
फळली
|
एखाद्याचा डाव
त्याच्यावरच उलटणे.
|
81
|
गुळाचा गणपती गुळाचाच
नैवेद्य
|
ज्याची वस्तु त्यालाच भेट
देणे.
|
82
|
गोगलगाय नि पोटात पाय
|
एखाद्याचे खरे स्वरूप न
दिसणे.
|
83
|
गोरागोमटा कपाळ करंटा
|
दिसायला देखणा पण नशिबाने
दुर्दैवी व्यक्ती.
|
84
|
घर ना दार देवळी बिर्हाड
|
बायको पोरे नसणारा एकटा
पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
|
85
|
घर फिरले म्हणजे घराचे
वासेही फिरतात
|
एखाद्यावर प्रतिकूल
परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
|
86
|
घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे
|
स्वत:च्या कामाचा व्याप
अतोनात असताना दुसर्यांने आपलेही काम लादणे.
|
87
|
घर पहावे बांधून लग्न
पहावे करून
|
अनुभवाने माणूस शहाणा
होतो.
|
88
|
घटका पाणी पिते घड्याळ
टोले खाते
|
आपापल्या कर्मानुसार
परिणाम भोगावे लागतात.
|
89
|
घरोघरी मातीच्याच चुली
|
सर्वत्र सारखीच परिस्थिती
अनुभवास येणे.
|
90
|
घोडे खाई भाडे
|
धंद्यात फायद्यापेक्षा
खर्च जास्त.
|
91
|
चढेल तो पडेल
|
गर्विष्ठ माणसाचा गर्व
उतरल्याशिवाय राहत नाही.
|
92
|
चालत्या गाडीला खीळ
|
व्यवस्थीत चालणार्या
कार्यात अडचण निर्माण होणे.
|
93
|
चमत्काराशिवाय नमस्कार
नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही
|
लोकांना काही विशेष कार्य
करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
|
94
|
चिंती परा येई घरा
|
दुसर्याबदल मनात वाईट
विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
|
95
|
चोर सोडून सान्याशाला
फाशी
|
खर्या गुन्हेगाराला शासन
न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
|
96
|
चोराच्या उलटया बोंबा
|
स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर
आळ घेणे.
|
97
|
चोराच्या मनात चांदणे
|
वाईट माणसांनाच वाईट
माणसांच्या युक्त्या कळतात.
|
98
|
चोरावर मोर
|
एखाद्या गोष्टीच्या
बाबतीत दुसर्यावर कडी करणे.
|
99
|
जळत्या घराचा पोळता वासा
|
प्रचंड नुकसानीतून जे
वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
|
100
|
जलात राहुन माशांशी वैर
करू नये
|
ज्यांच्या सहवासात राहावे
लागते त्यांच्याशी वैर करून नये.
|
101
|
जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला
|
निरक्षर किंवा निर्बुद्ध
माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
|
102
|
जळत घर भाड्याने कोण
घेणार
|
नुकसान करणार्या
गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
|
103
|
जावे त्याच्या वंशा
तेव्हा कळे
|
दुसर्याच्या स्थितीत आपण
स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
|
104
|
ज्या गावाच्या बोरी
त्याच गावच्या बाभळी
|
एकमेंकाचे वर्म माहीत
असणार्या माणसांशी गाठ पडणे.
|
105
|
ज्याचे खावे मीठ त्याचे
करावे निट
|
जो आपल्या वर उपकार करतो
त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
|
106
|
जशी देणावळ तशी धुणावळ
|
मिळणार्या मोबदल्याच्या
प्रमाणातच काम करणे.
|
107
|
ज्याचे करावे बरे तो
म्हणतो माझेच खरे
|
एखाद्याचे भले करायला
जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
|
108
|
जी खोड बाळ ती जन्मकळा
|
लहानपणीच्या सवयी जन्मभर
टिकतात.
|
109
|
ज्याच्या हाती ससा तो
पारधी
|
ज्याला यश मिळाले तो
कर्तबगार
|
110
|
जित्याची खोड
मेल्याशिवाय जात नाही
|
मूळचा स्वभाव आयुष्यात
कधीच बदलत नाही.
|
111
|
जिच्या हाती पाळण्याची
दोरी ती जगाते उद्धरी
|
मातेकडून बालकावर
सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
|
112
|
झाकली मूठ सव्वा लाखाची
|
व्यंग गुप्त ठेवणेच
फायद्याचे असते.
|
113
|
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
देवपण येत नाही
|
कष्ट केल्याशिवाय मोठेपणा
मिळत नाही.
|
114
|
टिटवी देखील समुद्र
आटविते
|
सामान्य क्षुद्र वाटणारा
माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
|
115
|
डोळ्यात केर आणि कानात
फुंकर
|
रोग एक आणि उपचार दुसराच
|
116
|
डोंगर पोखरून उंदीर
काढणे
|
प्रचंड परिश्रम घेवूनही
अल्प यश प्राप्ती होणे.
|
117
|
तंटा मिटवायला गेला
गव्हाची कणिक करून आला
|
भांडण मिटविण्याऐवजी
भडकावणे.
|
118
|
तळे राखील तो पाणी चाखील
|
आपल्याकडे सोपविलेल्या
कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
|
119
|
ढवळ्या शेजारी पवळ्या
बांधला वाण नाही पण गुण लागला
|
वाईट माणसाच्या
सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
|
120
|
ताकापुरते रामायण
|
आपले काम होईपर्यंत
एखाद्याची खुशामत करणे
|
121
|
तोंड दाबून बुक्यांचा
मार
|
एखाद्याला विनाकारण
शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
|
122
|
तेल गेले तूप गेले आणि
हाती धुपाटणे राहिले
|
फायद्याच्या दोन
गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे
|
मराठी म्हणी
Subscribe to:
Posts (Atom)