प्रश्नसंच : मराठी
१) नामाऐवजी वापरल्या जाणार्या शब्दाला काय म्हणतात ?
अ) विशेष नाम
ब) सर्वनाम
क) विशेषण
ड) क्रियापद
उत्तर : ब
====================
२) शब्दाच्या किती जाती आहेत?
अ) आठ
ब) पाच
क) तीन
ड) बारा
उत्तर :अ
====================
३) विसंगत पर्याय निवडा
अ) क - ख
ब) च - छ
क) ब - भ
ड) त - थ
उत्तर : क
====================
४) हरणाच्या कानात वारा शिरला ? (कर्ता ओळखा)
अ) हरीण
ब) शिरला
क) कान
ड) वारा
उत्तर : अ
====================
५) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे ? (शब्द शक्ती ओळखा )
अ) लक्षणा
ब) व्यंजना
क) अभिधा
ड) वरील पैकी सर्व
उत्तर : ड
====================
६) नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?
अ) द्विगु समास.
ब) द्वंद्वाव समास
क) कर्मधारय समास
ड) अलुक तत्पुरुष समास.
उत्तर : क
====================
७) स्वताशी केलेले भाषण म्हणजेच ?
अ) संवाद
ब) स्वगत
क) वाद
ड) नांदी
उत्तर : ब
====================
८) राजु जोराने धावतो. (प्रयोग ओळखा )
अ) भावे प्रयोग
ब) कर्मणी प्रयोग
क) सकर्मक कर्तरी
ड) अकर्मक कर्तरी
उत्तर :क
====================
९) कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?
अ) देशी
ब) तत्सम
क) तत्भव
ड) परभाषीय
उत्तर : ब
====================
१०) आई सारखी मायाळू आईच . (अलंकार ओळखा )
अ) उपमा
ब) व्यतिरेक
क) अनन्वय
ड) रुपक
उत्तर : ड
====================