विसंगत घटक

विसंगत घटक (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

विसंगत घटक याचा अर्थ असा की दिलेल्या संख्यामालिकेतील तीन पर्याय एका सुत्राने जोडलेली असतात तर त्यापैकी एक पर्याय हा त्या सुत्रापेक्षा वेगळा असतो. आशा प्रकारची उदाहरणे सोडवितांना प्रथम त्या सुत्राचा शोध घ्यावा लागतो. नंतर त्या सुत्राच्या आधारे आपणाला चुकीचा पर्याय शोधता येतो.
उदा.
  • 63
  • 80
  • 199
  • 122 
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील पहिले, दुसरे पद व चवथ्यापदामध्ये x²-1 या सुत्राचा आधार घेण्यात आला आहे. तिसर्‍या पदाला हे सुत्र लागू होत नाही. यामुळे उत्तर 199 हे आहे.
उदा.
  • 11
  • 13
  • 17
  • 21
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिले, दुसरे पद व तिसरे पद या मूळ संख्या आहेत. चवथे पद ही मूळ संख्या नाही. यामुळे उत्तर 21 हे आहे.
उदा.
  • 120
  • 160
  • 180
  • 200
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील दुसर्‍या, तिसर्‍या व चवथ्यापदामध्ये 20 चा फरक आहे. यामुळे उत्तर 120 हे आहे.
उदा.

  • 33
  • 53
  • 73
  • 83
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या पदाच्या दोन्ही अंकाची बेरीज केल्यास ती सम येते. तर चवथ्या पदाची बेरीज विषम येते. यामुळे उत्तर 83 हे आहे.
उदा.
  • 972
  • 633
  • 522
  • 844
स्पष्टीकरण : 
वरील संख्यामालिकेतील पहिल्या, तिसर्‍या व चवथ्या पदाला दोनने भाग जातो. दुसर्‍या पदाला भाग जात नाही. यामुळे उत्तर 633 हे आहे.

No comments:

Post a Comment