🔰 जनरल बिपिन रावत: भारताचे प्रथम संरक्षण दल प्रमुख (CDS)
...................................................................................................................................
भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख (Chief of Defence Staff -CDS) म्हणून भुदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे.
ते 1 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारतील. तर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे यांनी भारतीय भुदलाच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.
लष्करासंबंधी मुद्द्यांवर संरक्षण दल प्रमुख (CDS) हे सरकारचे सल्लागार असणार तसेच भुदल, हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देणार आहेत.
🔰 संरक्षण दल प्रमुख (CDS) पद
भारत सरकारने 4-स्टार जनरलच्या हुद्यामध्ये संरक्षण दल प्रमुख (CDS) पद स्थापन केले. CDSला इतर सेना प्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जाणार.
ते लष्कर व्यवहार विभागाचे (किंवा सैनिकी व्यवहार विभाग) प्रमुख असणार. हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने भुदल, हवाईदल आणि नौदला यांच्यासंदर्भातल्या नियमांमध्ये दुरुस्ती करत त्यात CDS वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सेवेत राहू शकणार, अशी तरतूद केली आहे.

No comments:
Post a Comment