चालू घडामोडी

Related image

● ११ एप्रिल : राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस

● राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस २०१९ संकल्पना : " Midwives For Mothers "

● 24×7 प्रदूषण शुल्क क्षेत्र लागू करणारे लंडन हे पहिले शहर बनले

● 2010 आणि 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या सरासरी 1.2 टक्क्यांनी वाढली आहे : युएन अहवाल

● व्हाट्सएपद्वारे बँकिंग लॉन्च करणारी अमीरात इस्लाम जगातील पहिली इस्लामिक बँक ठरली आहे

● पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला न्यूझीलंड पंतप्रधानांकडून सर एडमंड हिलरी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे

● आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 100 विजय मिळवणारा एम एस धोनी पहिला क्रिकेटपटू ठरला

● अब्देलकादर बेनसलाह यांची अल्जेरीया च्या राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली

● तेलुगू लेखक के एस रेड्डी यांना प्रतिष्ठित " सरस्वती सम्मान " २०१८ जाहिर

● गार्गी कौल यांची संरक्षण वित्त सचिव पदी नियुक्ती करण्यात आली

● मुरली कार्तिक यांची Fantasy 11 च्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली

● जागतिक जल शिखर संमेलन लंडन येथे ९ एप्रिल २०१९ रोजी आयोजित केले होते

● माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे

● दूरसंचार विभागाने टाटा टेलिसर्विसेस आणि भारती एअरटेल यांना विलिनीकरणासाठी मंजुरी दिली

● केयर्न इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर माथुर यांनी राजीनामा दिला

● पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार ' ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल ' जाहीर

● फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी : वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक २०१९ अहवाल



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


● दोन भारतीय नौदल जहाजे आयएनएस ‘कोलकाता’ व ‘शक्ति’ चिनी नौसेनाच्या 70 व्या वर्धापन दिन समारंभात सहभागी होणार आहेत

● Google ने ऑस्ट्रेलियात पहिली ड्रोन डिलीवरी सेवा सुरू केली आहे

● ड्रीम 11 भारतातील पहिले गेमिंग बिलियन डॉलरचे स्टार्टअप बनले आहे

● दक्षिण कोरियन सरकारी विमानचालन कंपनी कोरियन एअरचे प्रमुख चॉ यांग-हो यांचे निधन झाले

● आयपीएल मध्ये सर्वाधिक २० निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम दीपक चहरच्या नावावर

● भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सलग तिसऱ्यांदा ' विस्डेन क्रिकेटर आॅफ दी इयर ' चा मानकरी

● स्मृती मानधना ला ' विस्डेन वुमन क्रिकेटर आॅफ दी इयर ' पुरस्कार जाहिर

● नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच ब्लॅकहोल चा फोटो प्रसिद्ध केला

● इस्रायलचे पंतप्रधान म्हणून बेंजामिन नेत्यान्याहू यांची पाचव्यावेळेस निवड

● १३ एप्रिल 2019 ला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेला शंभर वर्षे पुर्ण होत आहेत

● जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्लूएचओ ) जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून कानपूर शहराचे नाव घोषित केले

● आंध्रप्रदेश न्यायालयाच्या प्रथम मुख्य न्यायाधीश पदी विक्रम नाथ यांची नियुक्ती

● बॅक आॅफ बडोदा च्या कार्यकारी संचालक पदी मुरली रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली

● पंजाब नॅशनल बँकेच्या च्या कार्यकारी संचालक पदी आर के यदुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली

● सिंडीकेट बँकेच्या च्या संचालक पदी वाय नागेश्वरा राव यांची नियुक्ती करण्यात आली

● इंडियन ओवरसीज बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करनाम सेकर यांची नियुक्ती

● भारत आणि सिंगापूर यांचा संयुक्त लष्करी सराव " बोल्ड कुरुक्षेत्र-2019 " झांसी येथे सुरु

● राज्यातील सात मतदार संघात आज (11 एप्रिल ) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे .



----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


📌चर्चित देश/व्यक्ती /निवड/आयोग:-
------------------------------
● भारत: #India
जागतिक कच्चे स्टील उत्पादनात भारताने जपानला मागे टाकतदुसरे स्थान पटकावले.या उत्पादनात चीन प्रथम क्रमांकावर आहे

● सुमनकुमारी:- #Niyukti
पाकिस्तानमध्ये पहिली हिंदू महिला न्यायाधीश म्हणून सुमनकुमारी यांची नियुक्ती करण्यात आली.कांबर -शाहदादकोट जिल्हामध्ये दिवाणीन्यायाधीशपदीत्यांची निवड करण्यात आली

● देवेंद्र फडणवीस आयोग:- #Ayog
लोकायुक्त व उप लोकायुक्त यांच्या नेमणुकीसाठी शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली

 चंदा कोचर :-

. बी.एन.श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने ठेवल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने तत्कालीन मुख्याधिकारी चंदा कोचर यांना बडतर्फ केले

* CBI ने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा आणि फसवणुकीचा गु्न्हा दाखल केला

चंदा कोचर:- #Niyukti

* मुंबईच्या जय हिंद कॉलेज मधून चंदा कोचर यांनी बी.कॉम केलं. 1982 मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ICAI मधून कॉस्ट अकाऊंटंसी चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली.

* १९८४ मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्या ICICI बँकेत रुजू झाल्या.

* १९९४ मध्ये ICICI चं रुपांतर संपूर्ण स्वायत्तता असलेल्या बँकेत झालं. तेव्हा चंदा कोचर यांची असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर नियुक्ती झाली.

* डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर अशी पदं सांभाळत २००१ मध्ये त्या बँकेच्या कार्यकारी संचालक झाल्या.

* २००९ मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या.

* त्यांचं योगदान पाहता भारत सरकारने त्यांना २०११ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.

* त्यांच्या नेतृत्वात ICICI बँक खासगी क्षेत्रातील दुसरी सगळ्यात मोठी बँक झाली

* फोर्ब्स मासिकाच्या १०० शक्तिशाली महिलांमध्येही त्यांचा समावेश होता.

ऋषी कुमार शुक्ला नवे CBI संचालक : #Niyukti

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती केली आहे.

* शुक्ला १९८४ बॅचचे अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे माजी डीजीपी आहेत.

ते मूळचे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरचे. त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी. टेक केलं

*ऋषी कुमार शुक्ला यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदावर निवड झाली आहे.

* सीबीआय संचालकाच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यात न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हे दोन सदस्य होते


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


● १० एप्रिल : जागतिक होमिओपॅथी दिन

● द्विपक्षीय आर्मी कमांडर्सची कॉन्फरन्स नवी दिल्ली येथे सुरू झाली

● भारतीय महिला फुटबॉल संघाची ऑलिम्पिक पात्रतेची संधी हुकली

● भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरला उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी आढळल्याबद्दल ४ वर्षांची बंदी

● लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल 2019 ला

● जनगणना 2021 साठी नवी दिल्ली येथे आज डेटा युजर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती

● जनगणना 2021 जगातील सर्वात मोठी जनगणना असून 33 लाख गणक माहिती गोळा करतील

● गोवा, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे 19 मे 2019 ला विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान

● जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त २ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती

● देशातील 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद हे ८५ व्या स्थानावर आहे

● देशातील 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ 88 व्या क्रमांकावर आहे

● देशातील १०० सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये आयआयटी बॉम्बे ने तिसरे स्थान पटकावले

● देशातील १०० सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 31 वी रँकिंग प्राप्त

● इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) या कंपनीला प्रतिष्ठित ' AIMA मॅनिजिंग इंडिया अवॉर्ड 2019 ' दिला गेला

● अखिल भारतीय व्यवस्थापन संघाचा (AIMA ) लाइफटाइम कॉन्ट्रीब्यूशन अवॉर्ड ' अझीम एच. प्रेमजी ' यांना प्रदान

● अखिल भारतीय व्यवस्थापन संघाचा (AIMA) बिजनेस लीडर ऑफ द इयर ' संजीव मेहता ' यांना प्रदान

● जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार , परदेशातून मायदेशी पैसे पाठविण्यामध्ये भारतीय अव्वल ठरले आहेत

● 2018 साली भारतीयांनी मायदेशी 79 अब्ज डॉलर ( सुमारे 5474.5 अब्ज रुपये ) एवढी एकूण रक्कम पाठवली

● अरुणाचल प्रदेशात लोकसभा निवडणूकीचे प्रथम मतदान ITBP दलाच्या सैनिकांकडून

● दुसर्‍या महायुद्धादरम्यान 1944 साली लढलेली कोहिमाची लढाई या घटनेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झालीत

● भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे

● जपान या देशात १ मे पासून " रेवा " या नव्या युगाची सुरवात होत आहे

● फ्रान्सने गुगल , ऍमेझॉन , फेसबुक आणि ऍपलसारख्या कंपन्यांवर नवी " गाफा " करप्रणाली सुरू केली

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला ' पीएम नरेंद्र मोदी ' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती

● राष्ट्रीय इमारत व बांधकाम निगमच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी शिवदास मीना यांची नियुक्ती

● आर ए एस नारायणन यांची कँनरा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद झालेल्या सीआरपीएफ च्या जवांनाच्या कुटुंबासाठी " वीर परीवार " अँप लाँच केले

● 2019 साली भारताचा वृद्धीदर 7.3% एवढा तर 2020 साली 7.5% एवढा असण्याची शक्यता आहे : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

● विक्रमजीत साहनी यांची आंतरराष्ट्रीय वाणिज्य संघटना - इंडियाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती .